उद्या महाष्ट्रात कुठेही मोफत पहा उरी चित्रपट..! कारगिल विजय दिनी युवकांमध्ये जागवणार "हाऊज द जोश"

Foto
औरंगाबाद: उद्या म्हणजेच २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्याची पराक्रमाची, शौर्याची यशोगाथा तरुणांचा अंतःकरणी बिंबवण्यासाठी 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' हा देशभक्तीपर सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात मोफत दाखवण्यता येणार आहे. या माध्यमातून देशातील युवकांमध्ये "हाऊज द जोश"जागवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होणार आहे.  कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी याविषयीची घोषणा केली आहे. 

तरुणांच्या अंगी देशभक्तीची भावना रुजावी. भारतीय सैन्याची पराक्रमाची व शौर्याची जाणीव युवकांना व्हावी. या उद्देशाने महाराष्ट्रातील ४९७ चित्रपट गृहात हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे. जवळपास अडीच लाख युवक यामाध्यमातून उद्या हा चित्रपट पाहतील असंदेखील निलंगेकर यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवून शत्रूंपासून देशवासीयांची रक्षण करण्यासाठी सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या जवानांप्रती आपली सहनुभूती व्यक्त करण्यासाठी प्रत्येक युवकाने हा चित्रपट पाहावा व आपल्या मित्रांना देखील यासाठी प्रेरित करावे असे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. 

"उरी दि सर्जिकल स्ट्राईक"
 हा चित्रपट १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीर मधल्या उरी येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्यावर आधारित हा चित्रपट असून या हल्यात १८ सैनिक शहीद झाले होते. या हल्याला प्रतिउत्तर देत भारतीय सैन्याने चार अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. १ जानेवारी २०१९ रोजी “उरी दि सर्जिकल स्ट्राईक” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता कारगिल दिनानिमित्त युवक युवतीमध्ये पुन्हा एकदा नवचेतना निर्माण करण्यासाठी येत्या २६ जुलै रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला यांनी केली असून या चित्रपटात विक्की कौशल याने मेजर विहानसिंह शशेरगिल ची भूमिका साकारली आहे. यासोबतच चित्रपटात परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी, यामी गौतम यांच्या भूमिका आहेत. चित्रपटातील विक्की कौशल यांचा लष्करातील आदेश “हाऊज द जोश” हाय सर…आणि परेश रावल यांचा “ये नया हिंदुस्थान अब चूप नाही बैठेगा, ये नया हिंदुस्थान है…ये घर में घुसेगा भी, और मारेगा भी… हे संवाद देशभक्तीची चेतना निर्माण करतात.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker